

Beed PMAY Housing Grant Scam
esakal
बीड : नगरपंचायतीवर बॉडी नसताना प्रशासक राजवटीत गोरगरिबांच्या घरकुल अनुदानाची उधळपट्टी करणाऱ्या अधिकारी मंडळींकडे अतिरिक्त पदभार होता. अतिरिक्त पदभार असतानाही चार कोटी २४ लाख रुपयांचे केजमधील घरकुल लाभार्थींचे अनुदान ठेकेदार, कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आले. विशेष म्हणजे स्वत:कडे पदाभार नसलेल्या काळात दोन अधिकाऱ्यांनी यातील तब्बल ११४ धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्याचे समोर आले आहे.