

Beed News
esakal
बीड: साहेब, सूर्याचे गोळे अंगाची लाहीलाही करताहेत. घसा कोरडा पडलाय, घरातली भांडी रिकामी झालीत आणि काळजाचा तुकडा असलेल्या माझ्या दोन वर्षांच्या लेकाला पाजायला थेंबभर पाणीही शिल्लक नाही. सरकार म्हणतंय नळाला पाणी येईल, पण आमचा जीव तर तलावावर पाणी ओढतानाच जातोय. सांगा ना, आमची चूक काय? ९३ लाखांची ती जलजीवन योजना नक्की कोणाची तहान भागवतेय? आमच्या कल्पनेने तर एका घागरीसाठी त्या खोल तलावात प्राण सोडले. आता सांगा, तिच्या त्या तीन चिमुकल्यांना पाणी कोण पाजणार आणि आईची माया कोण देणार?