Walmik Karad : चारच दिवसांत दिले ‘ना हरकत’ प्रमाणपत्र; कराडच्या वाइन शॉपसाठी नियम धाब्यावर
Wine Shop License : वाल्मीक कराडला गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर चारच दिवसांत वाइन शॉपसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले गेले. प्रशासनाच्या लांबणीवर असलेल्या नियमांची उणीव समोर आली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणानंतर वाल्मीक कराडची प्रशासनावर असलेली जरब आणि त्याच्यासाठी घातलेल्या पायघड्यांचे एकेक किस्से समोर येत आहेत.