Nanded News
esakal
मराठवाडा
Nanded News: दोन एकरांत केशर आंब्याची बाग; पानशेवडीच्या शेतकऱ्याला साडेपाच लाखांचे उत्पन्न
Farmer Develops Profitable Kesar Mango Orchard: पानशेवडी (ता. कंधार) येथील शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी दोन एकरांत केशर आंब्याची बाग फुलवत यंदा साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळवले. मनरेगा योजनेच्या मदतीने आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरल्यास कमी क्षेत्रातूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
फुलवळ: पानशेवडी (ता. कंधार) येथील अल्पभूधारक शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी आपल्या पारंपरिक शेतीसोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार दोन एकरात केशर आंब्याची बाग विकसित केली आहे.
योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर कमी क्षेत्रातून त्यांनी यावर्षी ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यांच्या प्रयोगाला चांगले यश आले आहे.

