
उमरगा : उमरगा - लातूर मार्गावर नारंगवाडी पाटी पासुन कांही अंतरावरील साठवण तलावाच्या पुलावर इनोव्हा कार - महिंद्रा पिकअप जीपचा जोरदार अपघात झाला आहे. शुक्रवारी (ता.सात) सांयकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान या अपघातात शिवसेना नेते केशव उर्फ बाबा पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र महिंद्रा पिकअप जीपमधील पाच जणाला गंभीर दुखापत झाली आहे.