

Latur News
esakal
औसा: उन्हाळ्यात कॉटनच्या नॅपकिन (गमचा) व हातरुमालांना मोठी मागणी वाढत असून, खादी वस्त्रांकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात खादीच्या वस्त्रांचे उत्पादन व विक्री करणारी केंद्र शासनाच्या अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग आयोग मान्यताप्राप्त मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थेच्या उत्पादन व विक्रीतही लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे.