
जालना : सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांसह कृषी विभाग करत आहे. ''शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'' या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.