

Students Develop a Thriving Kitchen Garden on School Campus
Sakal
संतोष निकम
कन्नड : तालुक्यातील खातखेडा येथील जिल्हा परिषदेच्या नवीन वसाहत शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात भाजीपाला परसबाग फुलवत एक आदर्श उपक्रम राबविला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पणा धाटबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी करडई, मुळे, पालक, मेथी, कोथिंबीर, आंबट चुका आदी विविध भाज्यांची लागवड केली आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी रोपांची लागवड, त्यांची निगा, पाणी व्यवस्थापन तसेच भाजी काढणीपर्यंतची सर्व कामे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः उत्साहाने पार पाडली.