

Khelna Medium Irrigation Project bund overgrown with thorny bushes farmers demand immediate cleaning in Sillod
Sakal
राहुल पारवे
पालोद : सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरातील महत्त्वाच्या खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळू, कालवा व साठवण क्षेत्राला १५ ते २० फुटांपर्यंत वाढलेल्या काटेरी झुडपांनी आणि मोठ्या झाडांनी अक्षरशः विळखा घातला आहे. अनेक वर्षांपासून साफसफाई न झाल्याने पाळूचे जंगलात रूपांतर झाले असून सिंचन विभागाच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.