पत्नी, दोन मुलींची हत्या करून एकाची आत्महत्या 

SUICIDE
SUICIDE

आळंद (औरंगाबाद) : आळंद ते बोरगाव रस्त्यावरील पिंप्री (सातळ, ता. फुलंब्री) येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयस्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी (ता. 31) सकाळी उघडकीस आले. यात कृष्णा तात्याराव देवरे (वय 30) यांनी पत्नी शिवकण्या कृष्णा देवरे (वय 25) मुली  सर्वदा कृष्णा देवरे (वय 6) इंदवी कृष्णा देवरे (वय 5) यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कृष्णाचे वडील तात्याराव देवरे पिंप्री येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष आहेत. सदरील घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

कृष्णा तात्याराव देवरे (वय 30) हे आपल्या आई वडील व कुटुंबासह एकाच ठिकाणी वेगळ्या घरात  राहत होते नेहमी प्रमाणे कृष्णा देवरे यांचे वडील व आई उठून घराच्या पाठीमागे वाड्यात चहा पाणी केले. मात्र, कृष्णाच्या घराच्या दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाज्या उघडायला गेले असता दरवाज्याला एक चिठ्ठी लावलेली आढळली त्यामध्ये लिहले होते 'आधी पोलिसांना फोन करा नंतर दरवाजा उघडा' तसेच आठ वेळेस राम राम लिहले होते. त्यांनी आत डोकून बघितले असता कृष्णा हे पत्राला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली पोलीस पाटील पांडुरंग पवार यांनी वडोदबजार पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलिस निरीक्षण अर्चना पाटील सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी वदोडबजार प्राथमिक केंद्रात पाठविले.

उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली 
या घटनेचे कारण समजू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com