Kiran Jharkar
sakal
- धनंजय शेटे
भूम - भूम तालुक्यातील ईट गावचे सुपुत्र तथा धाराशिव येथील कै. उद्धवराव दादा पाटील आयटीआय महाविद्यालयात शिल्प निदेशक (कोपा) म्हणून कार्यरत असलेले किरण प्रकाश झरकर यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आयटीआय शिक्षकाला राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.