किसान सभेचे हिंगोलीत धरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

किसान सभेचे हिंगोलीत धरणे

हिंगोली : सात हजार क्विंटल हरभरा खरेदीचे पैसे बुडविणाऱ्या नाफेड, महाफार्मर कंपनी विरुद्ध कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये अनेकांनी नाफेडच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या MAHAFPC नियंत्रित पूर्णा व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी मर्या (येळी, ता. औंढा) च्या खरेदी केंद्रावर हरभरा विकला आहे. सदर खरेदी व्यवहारात गैरप्रकार करून शेतकऱ्यांची लूट व फसवणूक करण्यात आली. सुमारे सहा हजार क्विंटल खरेदी केलेल्या हरभरा या शेतीमालाची कोणतीही किंमत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचा हरभरा नाफेड व MAHAFPC प्रशासनाच्या कब्जात आहे. हरभरा खरेदी केलेल्या मालाची संगणकात त्याच दिवशी नोंद न करता अनेक दिवस विलंब करण्यात आला. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांच्या विक्रीची नोंदच घेण्यात आलेली नाही. त्याच बरोबर कोणताही शेतमाल विकलेला नसताना बोगस नावाने नोंदी करून शेतकऱ्यांची फसवणूक देखील केली. शेतमालाची खरेदी करताना वजन काटा व हमाली यासाठी सातशे रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकऱ्यांकडून हमाली वसूल करण्यात आली आहे.

आता हरभरा खरेदीचे पैसे बुडविणाऱ्या नाफेड, महाफार्मर कंपनी विरुद्ध कारवाई करुन थकीत चुकारे तत्काळ अदा करावेत, हमाली व बारदाण्यासाठी वसुल केलेली नियमबाह्य रक्कम अदा करावी, दोषी अधिकारी व संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, बाबाराव कुटे, दीपक सानप, रमेश सानप, भगवान सांगळे, विष्णू सांगळे, बबनराव सानप, रघुनाथ सानप, अभिषेक सानप, प्रभाकर राऊत, विठ्ठल पारवे, प्रसाद पारवे, ज्ञानदेव गारकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kisan Sabha Protest Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..