Parli Vaijnath News : सरकारला जागे करण्यासाठी किसान सभेचा बुधवारी बीड जिल्ह्यात 'रस्ता रोको'चा एल्गार

बळीराजा मरण यातनेत, मायबाप सरकार गाढ झोपेत!
ajay burande

ajay burande

sakal

Updated on

परळी वैजनाथ - बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या काही भागात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पावसाची तब्बल ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. एकीकडे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढत असताना, सरकार मात्र गाढ झोपेत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. याच झोपलेल्या आणि असंवेदनशील व्यवस्थेला जागे करण्यासाठी किसान सभेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वदिनी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी किसान सभा बीडच्या वतीने बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र 'रस्ता रोको' निदर्शने करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com