

२९ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर-सोलापूर मार्गावरील पैठण फाटा येथे आंदोलन. त्यानंतर अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू
३० ऑगस्ट : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची जरांगे यांच्याशी चर्चा. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे करून दिले
३१ ऑगस्ट : तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांची उपोषणस्थळी भेट
१ सप्टेंबर : सायंकाळी पोलिसांचा ताफा उपोषणस्थळी. पोलिस-आंदोलकांत धुमश्चक्री, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, प्लास्टिक बुलेट झाडल्या, जमावाकडून दगडफेकीचा दावा लाठीमार घटनेचे जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी पडसाद
२ सप्टेंबर : जालना शहरात रास्ता रोको, पोलिसांवर दगडफेक, ट्रकसह कार जाळली. संभाजीराजे छत्रपती, शरद पवार, उदयनराजे भोसले, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार आदींची आंदोलनस्थळी भेट
३ सप्टेंबर : सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन, आमदार नीतेश राणे शिष्टाईसाठी दाखल. पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार शैलेश बलकवडे यांच्याकडे. विजय वडेट्टीवार, बाळा नांदगावकर यांनी घेतली भेट
४ सप्टेंबर : राज ठाकरे, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, इम्तियाज जलिल यांची भेट. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर जरांगे यांचे बोलणे करून दिले
५ सप्टेंबर : गिरीश महाजन यांची दुसऱ्यांदा शिष्टाई, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट
६ सप्टेंबर : रावसाहेब दानवे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर यांची जरांगेंशी चर्चा, रामदास आठवले यांची भेट. लाठीमार प्रकरणाची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी भेट. निजामकालीन नोंदींनुसार कुणबी दाखले देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
७ सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर दाखल. अध्यादेशातील वंशावळ शब्द वगळण्याची जरांगेंची मागणी. जरांगेंचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला. रात्री उशिरापर्यंत मुंबईत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांबरोबर शिष्टमंडळाशी चर्चा
८ सप्टेंबर : जरांगे यांचे मूळ गाव असलेल्या मातोरी (जि. बीड) येथील ग्रामस्थ आंदोलनस्थळी, आई प्रभावती यांनीही घेतली भेट
९ सप्टेंबर : अर्जुन खोतकर, नारायण कुचे दुसरा अध्यादेश घेऊन आंदोलनस्थळी. जरांगेंनी तो नाकारला
१० सप्टेंबर : पडताळणी नको, मराठा नोंद असणाऱ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी जरांगेंची भूमिका
११ सप्टेंबर : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा मुंबईत सर्वपक्षीय ठराव. आंदोलन मागे घेण्याची विनंती. टिकाणाऱ्या आरक्षणाची खात्री देण्याची जरांगेंची मागणी
१२ सप्टेंबर : मुख्यमंत्री आल्यास उपोषण सोडण्याची जरांगेंची तयारी. शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव निलंबित, संभाजी भिडे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आंदोलनस्थळी. उदय सामंत चर्चेसाठी दाखल.
१३ सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर मात्र, ऐनवेळी रद्द. रात्री अकरा वाजता रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आंदोलनस्थळी. पहाटे तीनपर्यंत चर्चा
१४ सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांचा अचानक दौरा, सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री दाखल. चर्चेनंतर जरांगेंनी उपोषण सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.