
उमरगा (जि. धाराशिव) : तालुक्यातील कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांसमोरील छत शुक्रवारी (ता. एक) कोसळले. पहाटे पाचला घडलेल्या या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दुसऱ्या वर्गखोल्यांत व कार्यालयात पर्यायी व्यवस्था करण्यात आली.