
पाचोड : कोटक फायनान्स कंपनीच्या एका कर्मचार्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी(ता.२५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात उघडकीस आली असून जनार्धन इंद्रजीत सानप (वय ४० वर्षे)रा.पानेगाव (ता.अंबड), ह.मु. रामनगर, छत्रपती संभाजीनगर असे जीवन संपवलेल्या बँक कर्मचार्याचे नाव आहे.