

Hingoli Sports Reservation
esakal
हिंगोली: राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील पाच टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळावा, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. पदभरतीसाठी हे क्रीडा ई-प्रमाणपत्र आता अनिवार्य करण्यात आले आहे.