महात्मा गांधींना ग्रॅण्डफादर म्हणावे लागेल : कुमार केतकर 

अतुल पाटील
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना "फादर ऑफ इंडिया' म्हटले आहे. मोदी जर, राष्ट्रपिता असतील तर, महात्मा गांधी यांना ग्रॅंड फादर म्हणावे लागेल.''

औरंगाबाद : "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना "फादर ऑफ इंडिया' म्हटले आहे. मोदी जर, राष्ट्रपिता असतील तर, महात्मा गांधी यांना ग्रॅंड फादर म्हणावे लागेल.'' अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ पत्रकार तथा कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी केली. एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात शनिवारी (ता. 28) अरुण साधू स्मृति व्याख्यान आणि पाठ्यवृत्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. 

आजची माध्यमे आणि राजकारण या विषयावर राजदीप सरदेसाई यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुमार केतकर बोलत होते. श्री. केतकर म्हणाले, "मोदी भक्‍त आणि गोडसे भक्‍त एकच आहेत. मोदींना राष्ट्रपिता करायची सगळ्यांनाच घाई झाली आहे. भाजपालाही भारतीय नोटांवर गोडसेचे फोटो छापायचे आहेत. गोडसेने गांधी यांच्या खुनाच्या आधी काही कार्य केले आहे काय? समाजकार्य केले आहे काय? हे पाहिल्यास खुन करण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. तसेच गोडसे भक्‍त गांधींच्या बदनामीपलीकडे काही केले नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumar ketkar say mahatma gandhi is the only father of nation