कुंभार पिंपळगाव: जीर्ण आणि लोंबकळलेल्या वीजतारा, वाकलेले खांब, तारांना बांधलेल्या कमट्या, तसेच रोहित्रांवर फ्युज आणि इतर सुरक्षा साधनांचा अभाव यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे रामभरोसे झाला आहे. .कधीही वीज येते आणि कधीही जाते, तर दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात २० ते २२ तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागातील वीजदुरुस्तीकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे..Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट.कुंभार पिंपळगावात १९७२ पासूनची वीजयंत्रणा आजही कार्यरत आहे. मात्र, या जुन्या तारा व खांब अत्यंत जीर्ण झाले असून तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. दररोज तारा तुटण्याच्या घटना घडत असून, तात्पुरत्या स्वरूपात कमट्या बांधून किंवा जवळच्या घरांना आधार देऊन वीजपुरवठा सुरू ठेवला जात आहे..अनेक खांब तळापासून तुटलेले असून ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांतून वीजतारा गेलेल्या असल्याने वीजपुरवठा सतत खंडित होत आहे..Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर.याकडे महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात महावितरणकडून तातडीच्या कामांच्या नावाखाली दोनवेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये कधी १२ तास तर कधी १४ तास वीज गायब होती. त्यामुळे कुंभार पिंपळगावसह परिसरातील ३२ गावांतील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.