esakal | याच आठवड्यात धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले प्रयोगशाळेचे उदघाटन 
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे

सोमवारीच त्यांच्या हस्ते अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उदघाटन झाले. 

याच आठवड्यात धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले प्रयोगशाळेचे उदघाटन 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना व त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या इतर चौघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. दरम्यान, सोमवारीच त्यांच्या हस्ते अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उदघाटन झाले. 

परळी शहरातील एका वृद्धेला औरंगाबादेत उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी तिच्या संपर्कातील अनेकांची तपासणी करण्यात आली. संबंधित महिलेच्या नातेवाईकांचा श्री. मुंडे यांच्या जवळच्या लोकांशी संपर्क आला का याचीही पडताळणी झाली होती.

हेही वाचा - सार्वजनिक जीवनमान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच...

दरम्यान, त्या महिलेच्या निकट संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, सोमवारी (ता. आठ) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उदघाटन व लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी फिरून पाहनीही केली.

या कार्यक्रमात शारीरिक अंतराचा फज्जा उडल्याची टीकाही झाली. कार्यक्रमाला राजकीय लोकांसह प्रशासन व आरोग्य विभागातील अनेक बडे अधिकारी हजर होते. दरम्यान, त्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व मंत्रिमंडळ बैठकीसाठी धनंजय मुंडे मुंबईला गेले.

हे देखील वाचाच - पहिल्याच पावसात शेतीची झाली दाणादाण

त्यानंतर गुरुवारी यांच्यासह त्याचे स्वीय सहाय्यक व चालकांची तपासणी करण्यात आली. सर्वांनाच कुठलेही लक्षणे नसताना पाच जणांना कोरोना विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मागच्या चार दिवसांत धनंजय मुंडे व त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी क्वारंटाईन व्हावे, नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.