बीड - माझ्या भांडणाची शुटींग का काढतो, मी शंभर पोलिसांच्या बदल्या करतो, माझे काय वाकडे होते, असे म्हणत एका मजूरावर चौघांनी हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आहेरवडगाव येथे घडली. यामध्ये कृष्णा राजाराम रोहिटे (रा. आहेरवडगाव, ता. जि. बीड) हे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.