Georai News : बीडमधील गेवराईतील अठ्ठ्याऐंशी गावात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच होतात अंत्यसंस्कार

स्मशानभूमी नसल्याने बीडमधील गेवराईतील ८८ गावातील रस्त्याच्या कडेला, काही गावात शेतात अजूनही उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
Open Funerals
Open Funeralssakal
Updated on

गेवराई - स्मशानभूमी नसल्याने बीडमधील गेवराईतील ८८ गावातील रस्त्याच्या कडेला, काही गावात शेतात अजूनही उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना ऐन वेळी थातूरमातूर पत्रे उभे करून अंत्यसंस्कार करण्याचे प्रसंग येत असून, मरणानंतरही मृतदेहाची स्मशानभूमी अभावी परवड(अवहेलना) होत आहे.

गेवराई तालुक्यात एकूण १३८ ग्रामपंचायती आहेत. आजच्या परिस्थितीत गावात फक्त ५० स्मशानभूमी आहेत. स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी उलटून गेली तरी आद्याप ८८ गावे स्मशानभूमी विना असल्याने मृत झालेल्या व्यक्तीला मरणानंतर देखील पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.

स्मशानभूमी नसल्याने मानवी जिवनात जे १६ संस्कार मानले जातात त्यापैकी अंतिम संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार असून या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतेचे लक्ष नसून या बाबतीत कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव दाखल होत नसल्याचे गावगावातील नागरिकांत बोलले जात आहे. दरम्यान काही गावात स्मशानभूमी तर आहेत मात्र शेड आणि बसण्यास ओठे नाहीत.

शेडसह स्मशानभूमी विना असलेली गावे -

आहेर वाहेगाव, एरंडगाव, अर्धं मसला, औरंगपुर कुकडा, बाबुलतारा, बाग पिंपळगाव, बंगाली पिंपळा, भाट आंतरवाली, भेंड खुर्द, भेंड टाकळी, भोजगाव, बोरगाव बुद्रुक, बोरगाव थडी, चकलांबा, चव्हाण वाडी, चोरपुरी, दैठण, ढालेगाव, धानोरा, धोंडराई, धुमेगाव, डोईफोडवाडी, गैबी नगर तांडा, गायकवाड जळगाव, गौंडगाव, गोळेगाव, गोंदी खुर्द, गोपत पिंपळगाव, गुळज, गुंत्तेगाव, हिवरवाडी, जयराम नाईक तांडा, जातेगाव, जव्हार वाडी, काजळा, कांबी मजरा, केकत पांगरी, खेर्डावाडी, कोल्हेर, कुंभारवाडी, कुंभे जळगाव, लुखा मसला, महांडुळा, महार टाकळी, मुधापुरी, मालेगाव बुद्रुक, मालेगाव खुर्द, मनुबाई जवळा, मिरगाव, मुळूकवाडी, नागझरी, निपाणी जवळका, पाचेगाव, पांचाळेश्वर, पांढरवाडी, पाथरवाला बुद्रुक, पौळाचीवाडी, पोखरी, राहेरी, राक्षस भुवन, रामपुरी, रानमळा, रसुलाबाद, रेवकी, रोहितळ, रूई, सैदापुर, संगम जळगाव, सावळेश्वर, शहाजनपुर चकला, शेकटा, सिंदफणा चिंचोली, सिंदखेड, सिरसदेवी, सुर्डी बुद्रुक, सुशी, सुशी वडगांव, ताकडगाव, टाकळगाव, तळेवाडी, तळवट बोरगाव, वडगांव ढोक, वाहेगाव अम्ला, वंजारवाडी, वसंत नगर तांडा, बाला नाईक, तांडा टाकळगाव, एरंडगाव या गावात आजही स्मशानभूमी नाही.

या गावात स्मशानभूमी आहेत त्यातही काही गावात अपूर्णच -

आगर नांदुर, आम्ला, आंतरवाली बुद्रुक, अर्धापिंपरी, बेलगाव, भडंगवाडी, भेंड बुद्रुक, भोगलगाव, बोरी पिंपळगाव, चोपड्याचीवाडी, देवपिंपरी, धारवंटा, दिमाखवाडी, गढी, गंगावाडी, गोविंदवाडी तहत तलवाडा, हिंगणगाव, हिरापुर, इटकुर, कट चिंचोली, काठोडा, खळेगाव, खामगाव, खांडवी, खेर्डा बुद्रुक, किनगाव, कोळगाव, मादळमोही, मानमोडी, मन्यारवाडी, मारफळा, माटेगाव, मिरकाळा, नांदलगाव, पाडळसिंगी, पांढरी, पिंपळगाव कानडा, राजापूर, राजपिंपरी, रांजणी, सावरगाव पोखरी, सेलू, सिरसमार्ग, सुरळेगाव, टाकळगव्हान, तळणेवाडी, तलवाडा, तांदळा, ठाकर आडगाव, उक्कडपिंपरी, उमापुर

पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पार्थिवाची होते अवहेलना -

पावसाळ्यात एखाद्याचे निधन झाल्यास तालुक्यातील विविध गावांमध्ये मरणानंतरही मृत माणसाचे हाल हाल होत असून, अक्षरशः स्मशानभूमी नसल्याने यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी अचानक पत्रे, लाकडे उभे करून अंत्यसंस्कार करावे लागतात अशी गंभीर परिस्थिती येते.आद्याप तरी स्मशानभूमी संदर्भात प्रस्ताव दाखल झाले नसल्याचे पंचायत समितीतील अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

‌माणूस आयुष्यभर कष्ट करून जगतो, आयुष्याभर संघर्ष सुरू असतो आणि एक दिवस जेव्हा तो जगात राहत नाही. तो गेल्यावर सुध्दा त्याच्या देहाला यातना सहन कराव्या लागतात.

ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या बाबतीत ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून माहिती घेऊन ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल करावेत. यावे दरम्यान, काही गावातील प्रस्ताव आले असून ते मंजूरीसाठी पुढील स्तरावर पाठविण्यात आले आहेत.

- मिना कांबळे, गटविकास अधिकारी, गेवराई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com