बसच्या धडकेत महिला ठार   

बाबासाहेब दांडगे
सोमवार, 30 जुलै 2018

गल्लेबोरगाव (औरंगाबाद) : पळसवाडी (ता.खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथील विमलबाई जयराम सातदिवे (वय 54 ) यांना सोमवारी (ता. 30) पहाटे 5.30 वा.परिवहन मंडळाच्या औरंगाबाद - नंदुरबार (एमएच 20 बीएल 3108) बसने रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. यात त्या जागीच ठार  झाल्या.  

विमलबाई वन विभागाच्या वन मजूर म्हणून कार्यरत होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण, शरद दळवी, शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. बस चालक भास्कर नागरे खुलताबाद पोलीस ठाण्यात हजर झाला असून अपघाताची खुलताबाद ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: a lady dies in bus accident