Lakhs of Devotees Visit Vaidyanath Temple on the First Shravan Monday
sakal
परळी वैजनाथ - यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांचा जनसागर उसळला. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ महाराज की जय, या जय घोषाने मंदिर परिसर दनाणून गेला. सायंकाळपर्यंत सुमारे दीड लाखावर भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. रात्रीही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.