esakal | उदगीर तालुक्यात जमिनीचा वाद गेला टोकाला, शेतकऱ्यावर गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

गोळीबारीत शेतकरी जखमी

उदगीर तालुक्यात जमिनीचा वाद गेला टोकाला, शेतकऱ्यावर गोळीबार

sakal_logo
By
सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर) : नागलगाव (ता.उदगीर) (Udgir) येथे जमिनीच्या वादातून रविवारी (ता.एक) सायंकाळी पाच वाजेच्या (Crime In Latur) दरम्यान शेजारील शेतकरी रमेश गुडसुरे यांच्यावर गोळीबार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी जखमीस लातूर येथे हलवण्यात आले आहे. पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी शिवाजी ज्ञानोबा पाटील (वय ६२ ) याने जमिनीच्या वादातून शेजारील शेतकरी (Farmer) रमेश गणपती गुडसुरे (वय ३५) व त्याचा भाऊ सतीश गणपती गुडसुरे यांच्यावर आरोपीने आपल्या कडील रिव्हाॅल्वरने गोळीबार केला आहे. त्यात रमेश यास गोळी लागलेली असुन गभीर जखमी झाले आहे. उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात होते.(land dispute lead into firing on farmer in udgir tahsil of latur district glp88)

हेही वाचा: बॉलिवूडलाही पडली औरंगाबादची भुरळ! २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण

त्यांची प्रकृती ठिक असून पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. यातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असुन गुन्हा नोंदण्याची प्रक्रिला चालू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडुन मिळाली आहे.

loading image
go to top