esakal | अजिंठा लेणीत दरड कोसळली
sakal

बोलून बातमी शोधा

अजिंठा लेणी दरड काेसळली

अजिंठा लेणीत सातव्या क्रमांकाच्या लेणीसमोर अचानक दरड कोसळली. यातून विद्यार्थ्यांसह इतर पर्यटक थोडक्‍यात बचावले.विदर्भातील एका शाळेची पन्नास विद्यार्थ्यांची सहल लेणी पाहण्यासाठी आली होती. दरड ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणापासून अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर हे विद्यार्थी होते.

अजिंठा लेणीत दरड कोसळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अजिंठा, ता. 1 (जि.औरंगाबाद ) ः अजिंठा लेणीत सातव्या क्रमांकाच्या लेणीसमोर अचानक दरड कोसळली. यातून विद्यार्थ्यांसह इतर पर्यटक थोडक्‍यात बचावले.विदर्भातील एका शाळेची पन्नास विद्यार्थ्यांची सहल लेणी पाहण्यासाठी आली होती. दरड ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणापासून अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर हे विद्यार्थी होते.

इतर पर्यटकही जवळपास होते. हे सर्वजण बचावले. कोणालाही इजा झाली नाही. दरड कोसळल्यानंतर दिवसभर पर्यटकांत भीतीचे वातावरण होते. असे प्रकार घडत असल्याने लेणीवर संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

loading image
go to top