
भोकरदन : जालना-जळगाव या महत्त्वाकांशी रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम गुरुवार (ता. २६)पासून सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातील १६ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. तालुक्यातून राजूर येथून जवळच असणाऱ्या तपोवन गावापासून प्रत्यक्ष मोजणीला सुरवात होणार आहे.