Beed : ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले

जनावरांचा बाजार बंदचा परिणाम, नेकनूरमध्ये लाखो रुपयांची उलाढाल थांबली
beed
beedsakal
Updated on

नेकनूर : कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून जनावरांचे आठवडी बाजार बंद असल्यास जमा होते. मागील सहा महिन्यांपासून आठवडी बाजार सुरू झाले. आता परिस्थिती पूर्व पदावर येताच जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजार पसरला पसरल्याने पुन्हा जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडून गेले आहे.

नेकनूर येथे रविवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार हा संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असून, मराठवाड्यातून या ठिकाणी व्यापारी, शेतकरी व ग्राहक खरेदी- विक्रीसाठी हजेरी लावतात. पण, मागील महिनाभरापासून जनावरांच्या लम्पी आजारामुळे जनावरांचे आठवडी बाजार बंद असून, या बाजार बंदचा फटका ग्रामीण अर्थकारणाला बसला आहे.

येथील आठवडी बाजारात जनावरे खरेदी- विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर आलेल्या पैशातून येथील आठवडी बाजारात अनेक व्यवहार केले जातात. ज्यामध्ये कपडे, सोने-चांदी, किराणा इतर सामान त्याचबरोबर खानावळी, नाश्त्याचे हॉटेल, चहाचे हॉटेल, वाहतूकदार, दलाल, पान टपरीवाले, शेतकरी, शेतमजूर या सर्वांचे व्यवहार येथील जनावरांच्या आठवडी बाजारातील खरेदी- विक्रीवरच अवलंबून आहेत.

बाजार बंदमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेल्याचे दिसत आहे. अनेकांवर संसाराचा गाडा चालवण्यासाठी उसनवारीची वेळ आली आहे. अगोदरच कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून बाजारावर आधारित अर्थकारण बिघडले आहे.

खानावळी पडल्या ओस

मागील महिनाभरापासून जनावरांचा बाजार बंद असल्याने बाजारातील खानावळी ओस पडल्या आहेत. चहाचे, नाश्त्याचे हॉटेल बाजारातून गायब झाली आहेत. तर, इतर काही दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Irfan Sheikh Success Story From Farmer Family To Second Government Job After Repeated Failures In Competitive Exams
Manoj Jarange Maratha Reservation Protest Says He Will Not Surrender And Will Go To Mumbai For An Indefinite Hunger Strike
A 1,200 mm main pipeline at the Farola water treatment plant burst, affecting water supply to Chhatrapati Sambhajinagar; repairs are expected to continue until midnight.
Gangapur MLA Prashant Bamb inaugurated a ₹3.70 crore VIP rest house and new government residences for officials, aimed at improving administrative accessibility.
Marathi News Esakal
www.esakal.com