चार दिवसांत उस्मानाबादेत ६५ मुलांना कोरोनाची बाधा

चार दिवसांत उस्मानाबादेत ६५ मुलांना कोरोनाची बाधा
Summary

जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्हिटी दर आणि मृत्यू दर खाली येत आहे. मात्र शून्य ते १८ वयोगटातील कोरोना रुग्ण पहिल्यांदाच आढळत आहेत.

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात जवळपास ६५ मुले कोरोनाबाधित Corona Positive Children झाली आहेत, जिल्हा रुग्णालयाने District Civil Hospital दिलेल्या माहितीत समोर आले आहे. जिल्ह्यातील कोरोना Corona पाॅझिटिव्हिटी दर आणि मृत्यू दर खाली येत आहे. मात्र शून्य ते १८ वयोगटातील कोरोना रुग्ण पहिल्यांदाच आढळत आहेत. ९ जून रोजी ११९ रुग्णांपैकी २५ मुलांचा समावेश होता. १० जून रोजी १०९ पैकी १९ मुले, तर ११ जूनला १२३ बाधितांपैकी २१ मुलांना कोरोना झाला होता. हे दाखवते की सरासरी १८ टक्के मुले कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. अशी स्थिती असताना कोरोनाबाधित मुलांपैकी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे प्रशासनाकडून जारी केलेल्या माहितीत पुढे आले आहे. अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनी भाकित वर्तवले आहे, की जेव्हा देशात तिसरी लाट येईल तेव्हा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो.Last Four Days 65 Children Tested Corona Positive In Osmanabad

चार दिवसांत उस्मानाबादेत ६५ मुलांना कोरोनाची बाधा
ना यशाचे कौतुक, ना निकालाची हूरहूर!विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

अनेक राज्यांतील आरोग्य विभाग अगोदरच तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी तयारीला लागले आहेत. केंद्र सरकारनेही मुलांच्या संरक्षणासाठी कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनतत्त्वेही जाहीर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com