कोलंबी येथे' त्या' तिघांवर अंत्यसंस्कार 

प्रदीप पाटील
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नायगाव (नांदेड) : कोलंबी (ता. नायगाव) येथील उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघा जणावर बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या आईची अस्थि विसर्जनासाठी वडिल, भाऊ, बहिण मेहुणे अशा चौदा जणांना घेऊन प्रयागराज येथे गेले होते. 

सोमवारी (ता. 10) सायंकाळी पावनेसात ते सातच्या दरम्यान यमुना नदीच्या प्रवाहात गेले असता त्यांची अचानक बोट उलटली होती. त्यात नांदेड व परभणी, लातूर जिल्ह्यातील मिळून आठ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्या पैकी सात जनांचे मृतदेह सापडले असून माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांचा मृतदेह अजूनही बेपत्ता आहे. 

दरम्यान मंगळवारी  प्रयागराज येथे कार्यालयीन कागदपत्राची पुर्तता करून रात्री साडेआठ वाजता एअर अॅन्बुलन्सने मृतदेह नांदेड आणण्यात आले. पैकी डाॅ. देविदास  नारायण कच्छवे, दिगंबर रामराव बैस व बालाजी दिगंबर  बैस यांचे मृतदेह कोलंबी येथे आणून त्यांच्यावर रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य प्रदेशउपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, राजेश पवार डाॅ. मीनल पाटील खतगावकर, पूनम पवार, प्रवीण चिखलीकर, माणिक लोहगावे, बालाजी बच्चेवार आदी उपस्थित होते.

Web Title: last rituals done on that 3 at kolambi nanded