

Latur News
esakal
हरी तुगावकर
लातूर: जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा, तेरणा नद्यांवर उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली. दर पावसाळ्यात या नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पावसाळ्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचीही यामुळे तारांबळ उडते.