Latur Accident : एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले,जमावाची बसवर दगडफेक

औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडवर पुन्हा एकदा बस आणि दुचाकीचा अपघात
Latur News
Latur Newsesakal

उजनी (जि.लातूर) : औसा-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडवर बुधवारी (ता.२७) पुन्हा एकदा बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये बसने दुचाकीला पाठीमागून धडक देत एकाला चिरडले आहे. तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी येथील बस व दुचाकीच्या अपघातात पिता व पुत्राचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आणखी एक अपघात झाल्याने ग्रामर येथील ग्रामस्थांकडून (Accident In Latur) संताप व्यक्त केला जात आहे. अधिक माहिती अशी की, शेषेराव वैद्य (वय ३५) असे अपघातात मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. ते आपले वडील आप्पाराव वैद्य यांच्यासोबत पंढरपूरहून दुचाकीवरुन (एमएच १३ एजी १०९१) दिवाळी सणासाठी चिंचोली काजळे (ता.औसा) या आपल्या गावी परतत होते. उजनी (ता.औसा) येथील मोडवर त्यांच्या दुचाकीला कवठेमहांकाळ- नांदेड या बसने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये वडील अप्पाराव वैद्य हे जखमी झाले (Latur) आणि त्यांचा मुलगा शेषेराव हा बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मरण पावला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

Latur News
नरेंद्र मोदी स्वातंत्र भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान : अमित शहा

अपघातानंतर तासभरात हटवली रस्त्यावरील माती

दरम्यान महामार्गावर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होऊन महिना लोटला असून देखील महामार्ग प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ता खुला करुन देण्यास दिरंगाई केली आणि अपघात होऊन एक जीव गेल्यानंतर तिच वाहतुकीसाठी अडसर ठरणारी माती तासभरात हटविण्याची तत्परता महामार्ग प्रशासनाने दाखवल्याचे पाहायला मिळाले. हीच तत्परता आधीच दाखवली असती तर आज एक निष्पाप जीव वाचला असता. त्यामुळे आता तरी महामार्ग प्रशासन अपघात रोखण्यासाठी पावले उचलणार आहे का? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com