Latur : बाजार समित्यांची निवडणूक पूर्वीच्या पद्धतीने

शेतकऱ्यांना मतदार म्हणून संधी नाही; पंच, सोसायटीचे संचालक मतदार
Agricultural Produce Market Committees Latur
Agricultural Produce Market Committees Latursakal

लातूर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पुढील वर्षी २९ जानेवारीला निवडणूक होईल. या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने होणार असून निवडणुकांत किमान दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. पूर्वीच्या पद्धतीत बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांना (पंच) मतदानाचा अधिकार असणार आहे. यामुळे कमी खर्च होणार असून मोठ्या संख्येने बाजार समितीच्या निवडणुका पार पडतील, अशी आशा सहकार विभागाला आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) अधिनियम २०२० नुसार सात वर्षांपूर्वीच्या युती सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीत समिती कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला होता. यामुळे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील केवळ दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात पूर्वीची सोसायट्यांचे संचालक व ग्रामपंचायतीचे सदस्यांना मतदानाचा अधिकाराची पद्धत बंद केली होती. या निर्णयामुळे निवडणूक खर्चात वाढ होऊन अनेक बाजार समित्यांना मुदत संपूनही निवडणुका घेणे शक्य झाले नव्हते. या पद्धतीने निवडणुका घेण्याची राज्यातील निम्म्याहून अधिक बाजार समित्यांची आर्थिक क्षमताच नव्हती.

यामुळे अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय फिरवत पूर्वीप्रमाणे सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. यातच सोसायट्यांच्या निवडणुका लागल्याने या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या सतांत्तरानंतर सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळात हा निर्णय झाला. मात्र, विधिमंडळात याबाबतचे विधेयकच सादर झाले नाही. यामुळे प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी पू्र्वीच्या पद्धतीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सोसायट्यांचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

राज्यातील बाजार समित्यांची स्थिती

  • एकूण बाजार समित्या ३०६

  • कोटीच्या पुढे उत्पन्न असलेल्या १७३

  • ५० ते एक कोटी उत्पन्न असलेल्या ६२

  • २५ ते ५० लाख उत्पन्न असलेल्या ३२

  • २५ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या २५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com