
लातूर : लातूर शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत आहे. येथील उद्योग, शिक्षण, कृषी क्षेत्रात उलाढाल वाढत असल्याने लातूरकरांचा अनेक मोठ्या शहरांशी संपर्क वाढत आहेत. त्यामुळे लातूरची विमानसेवा तातडीने सुरू व्हावी म्हणून येथील नेते प्रयत्न करीत आहेत. पण, त्यांच्या पदरी भरपूर आश्वासने आणि उदंड घोषणाच पडत आहेत. पंधरा वर्षांपासून विमानसेवा बंदच असल्याने विमानतळ ‘पांढरा हत्ती’ बनल्याचे चित्र आहे.