

Latur News
esakal
लातूर: लातूरच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या ठरणाऱ्या अमृत २.० या २५९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला सुरवातीच्या टप्प्यातच घरघर लागली आहे. महापालिका स्व हिस्सा भरत नसल्याने या योजनेसाठी केंद्र व राज्य शासन निधी अडवला आहे.
त्यामुळे या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दरम्यान, महापालिका पंधराव्या वित्त आयोगातून ५४ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी आले आहेत. हे पैसे स्व हिस्सा म्हणून भरले तर निधी उपलब्ध होणार आहे. पण, या पैशावर नेमका कोणाचा डोळा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेच्या कामाला घरघर लागली आहे.