

Tragic Incident During Harvesting in Ausa Taluka
Sakal
आशिव (जि. लातूर) : औसा तालुक्यातील आशिव परिसरात ऊस तोडणी सुरू असताना हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता.२४) रोजी दुपारी घडली. या अपघातात शेतकरी शंकर प्रभाकर सावंत (वय ३९) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. फक्त मुंडके शिल्लक राहिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.