

Latur Accident
sakal
औसा (जि. लातूर) : भरधाव ‘बीएमडब्ल्यू’ कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेंपोला (आयशर) धडक दिल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. औसा-तुळजापूर महामार्गावर शहराजवळील हॉटेल साईप्रसाद हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.