esakal | लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बस ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली, नऊ प्रवाशी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Accident News

या भीषण अपघातात बसची एक बाजू कापली असून

लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बस ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली, नऊ प्रवाशी जखमी

sakal_logo
By
सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि.लातूर) : बस व ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघात नऊ जण जखमी झाले आहेत. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात लातूर- अंबाजोगाई रस्त्यावरील रेणापूर- पिंपळ फाट्यालगत शनिवारी (ता. १३) रात्री घडला. अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेली लातूर आगाराची बस (एम.एच २०, बी.एल. १०५३) रेणापूर- पिंपळफाट्याजवळ विटाने भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून शनिवारी रात्री धडकली.

या भीषण अपघातात बसची एक बाजू कापली असून, बसमधील नऊ जण जखमी झाले. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर बसचालक केबिनमध्येच काही वेळ अडकला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top