esakal | Corona Updates: लातुरात कोरोनाचा कहर! २४ तासांत ९६९ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकड्याचा उच्चांक होत आहे आणि रोज पुर्वीचे रेकॉर्ड मोडले जात आहेत

Corona Updates: लातुरात कोरोनाचा कहर! २४ तासांत ९६९ नवीन रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लातूर: जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकड्याचा उच्चांक होत आहे. मंगळवारी (ता. सहा) एकाच दिवसात सर्वाधिक ९६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
 
जिल्ह्यात मंगळवारी एक हजार ६४१ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. यात ३७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोन हजार ६१८ जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट झाल्या. यात ५९३ जणांना लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकाच दिवसात ९६९ जणांना लागण झाली आहे.

Break The Chain: निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांचा रोष; शुक्रवारपासून दुकाने...

दरम्यान, उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार १६३ जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या सहा हजार ८७२ जणांवर उपचार सुरु आहेत. ३० हजार ५०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७८५ जणांचा मृत्यू झाला आहे. 


(edited by- pramod sarawale)

loading image