'मी मंत्रालयात सचिव झाल्यावर लातूरकर मला कधीही येऊन भेटू शकतील'

युवराज धोतरे
Monday, 25 January 2021

श्रीकांत म्हणाले, मागील चार वर्षांच्या काळात उदगीरकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले

उदगीर (लातूर): उदगीरची जनता ही प्रेमळ आहे. अडचणीच्या काळात जे लातूरकरांना जमले नाही ते उदगीरच्या नागरिकांनी करून दाखवले, असं मत यापुर्वी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले जी. श्रीकांत यांनी व्यक्त केलं.

कौळखेड (ता.उदगीर) येथील शिवम फंक्शन हॉल येथे रविवारी (ता.२४) आम्ही उदगीरकर यांच्यावतीने आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कंधारचे तहसीलदार वेंकटेश मुंडे उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सुर्यकात मुक्कावार, माजी कृषी सभापती बापुराव राठोड आदी उपस्थित होते.

40 वी मराठवाडा इतिहास परिषद उदगीरात; तारीख ठरली

यावेळी श्रीकांत म्हणाले, मागील चार वर्षांच्या काळात उदगीरकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले. अतिवृष्टी पाणी टंचाई कोरोना संसर्ग या अडचणीच्या काळात उदगीरकरांची सामूहिक जबाबदारी ओळखून काम करण्याची वृत्ती जाणिवेच्या पुढची आहे. या काळात जे लातूरकरांना जमले नाही, ते उदगीरकरांनी करून दाखवले. ही उदगीरसाठी गौरवाची बाब आहे.

यावेळी श्री अंबरखाने, श्री मेंगशेट्टी, श्री मुक्कावार, श्री बागबंदे, श्री मुंडे यांची भाषणं झाली. संयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन जी. श्रीकांत यांचा सत्कार झाला. यावेळी डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ संग्राम पटवारी, डॉ दत्ता पाटील, चंदन पाटील कौळखखेडकर, शांतवीर पाटील, मोतीलाल डोईजोडे, आदिती पाटील कौळखखेडकर अभिनय कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

'स्वबळावर लढून दाखवा' शिवसेनेचे काँग्रेसला आव्हान

मंत्रालयात थेट प्रवेश-

माझ्या सेवेची भरपूर वर्षे बाकी असल्याने मी भविष्यात देशपातळीवर किंवा इतर कुठंही काम करत असो तिथं लातूरकरांना थेट प्रवेश असेल, असं मत श्रीकांत यांनी मांडलं. पुढे बोलताना श्रीकांत म्हणाले की, मी मंत्रालयात सचिव झाल्यावरही लातूरकर मला कधीही येऊन भेटू शकतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur breaking news g shrikant udgir latest news