esakal | 3 अल्पवयीन मुलं अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ, शोध सुरु

बोलून बातमी शोधा

crime news udgir}

रात्रीपर्यंत शोध घेऊनही ही मुले सापडत नसल्याने अखेर या मुलाच्या पालकांनी शहर पोलिस ठाणे गाठून ठाण्यात तक्रार दाखल केली.

3 अल्पवयीन मुलं अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ, शोध सुरु
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर): शहरातील नगरपालिकेत समोरील फुटपाथवर पाल मारून राहणाऱ्या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले गुरुवारी (ता.२५) दुपार पासून गायब झाली आहेत. या मुलांचा शहर पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी नगरपालिकेसमोरील पाल मारून राहणाऱ्या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले घराकडे येत नसल्याने त्यांचा पालकांनी शोध घेतला. रात्रीपर्यंत शोध घेऊनही ही मुले सापडत नसल्याने अखेर या मुलाच्या पालकांनी शहर पोलिस ठाणे गाठून ठाण्यात तक्रार दाखल केली.

#BharatBandh: मराठवाड्यात भारत बंदला मिळतोय मोठा पाठिंबा; जाणून घ्या...

अंकुश व्‍यंकटराव चव्‍हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील अंकुश चव्हाण (वय-१२), सचिन विक्रम चव्हाण (वय-१३), दर्शन लक्ष्मण डांगे (वय-१५) यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Success Story: महिलेने स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या द्राक्ष बागेचे यशस्वी तिसरे...

उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री अंदोरीकर यांच्यासह संजय दळवे, डीबी शाखेचे राजकुमार घोरपडे, योगेश फुले, गजानन पुल्लेवाड, मच्छिंद्रनाथ वरटी, मारोती जायभाये हे दोन टीम द्वारे शोध घेत आहेत.