Latur: चापोली ग्रामपंचायतीचा 'तो' ठराव माहिती अधिकार कायद्याच्या विसंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat
Latur: चापोली ग्रामपंचायतीचा 'तो' ठराव माहिती अधिकार कायद्याच्या विसंगत

चापोली ग्रामपंचायतीचा 'तो' ठराव माहिती अधिकार कायद्याच्या विसंगत

चाकूर (जि.लातूर) : चापोली (ता.चाकूर) येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांला माहिती देता येत नाही असा मासिक बैठकीत ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतीचा तो ठराव माहिती अधिकार कायद्यानुसार विसंगत असून तो चुकीचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रद्द करावा असा आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिला आहे.

चापोली येथील ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झालेला असून याची चौकशी करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्या शकुंतला शेवाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज दिला होता. त्या सतत माहिती मागत असून विकास कामाला अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून ग्रामपंचायतीने २० आॅक्टोंबर २०२० च्या मासिक बैठकीमध्ये ठराव घेऊन आपणास माहिती देता येत नाही असे पत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांने शेवाळे यांना दिलेले आहे.

हेही वाचा: किराणा दुकानातंच मिळणार आता वाईन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

याविरूध्द त्यांनी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अौरंगाबाद यांच्याकडे अर्ज केला होता. या अनुषंगाने राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. माहिती जाणुन घेण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकारी भारतीय संसंदेने कायदा करून दिलाआहे त्यांचे उल्लंघन कोणत्याही पातळीवर करता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालय चापोली यांनी माहिती अधिकारात माहिती न देणे याबाबत घेतलेला ठराव नियमबाह्य असल्यामुळे तो तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी, तसेच जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून याची जाणीव करून द्यावी असा आदेश दिला आहे यामुळे चुकीचा ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतीला चपराक बसला आहे.

हेही वाचा: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

चापोली ग्रामपंचायतीने अंगणवाडीत साहित्यांची खरेदी न करता देयक उचलली आहेत हा भ्रष्टाचार माहिती अधिकार कायद्यानुसार दिलेल्या अर्जामुळे उघडकीस आलेला आहेत, ग्रामपंचायतीमध्ये लाखों रूपयाचा भ्रष्टाचार झालेला असून हे बाहेर येऊ नये यासाठी माहिती देता येणार नाही असा चुकीचा ठराव मासिक बैठकीमध्ये घेण्यात आला होता याविरूध्द राज्य माहिती आयोगाकडे अर्ज केल्यानंतर हा ठऱाव रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

- शकुंतला शेवाळे, चापोली.

Web Title: Latur Chapoli Grampanchayat Rule Illegal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top