Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Tile Production Halted Due to Gas Cylinder Shortage: युद्ध परिस्थितीचा परिणाम लातूरच्या बांधकाम क्षेत्रावर दिसू लागला आहे. सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प झाली असून लोखंड व सिमेंटचे दर वाढले आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: शहराच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढले आहे. मोठमोठे गृहप्रकल्प व बहुमजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. पण, सध्याच्या युद्ध परिस्थितीची झळ विविध क्षेत्रांबरोबरच शहरातील बांधकाम क्षेत्रालाही बसली आहे. गेल्या काही दिवसांत लोखंडाचे भाव पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. शिवाय, टाइल्सची आवकही पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पांची गती मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com