
लातूर : हासेगाव (ता. औसा) येथील सेवालय संस्थेतील एका मुलीवरील अत्याचार प्रकरणात संशयितांच्या जामीन अर्जावर बुधवारी (ता. सहा) येथील पोक्सो विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायाधीश एस.व्ही. जाधव यांनी संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांच्यासह चौघांना जामीन मंजूर केला आहे. मुख्य संशयिताचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सरकारी वकील मंगेश महिंद्रकर यांनी दिली.