
लातूर : चाकूरजवळ झालेल्या एका खून प्रकरणातील दोघांना जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी ठोठावली. चाकूरमधील लोहारे फर्निचरसमोर ता. सहा जुलै २०२० रोजी रात्रीच्या सुमारास या प्रकरणातील मृत प्रभाकर गोविंदराव साळुंखे याचा अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने त्यांची पत्नी आणि धनराज सुधाकर आगलावे, राजू लक्ष्मण गायकवाड यांच्या मदतीने डोक्यात दगड घालून तसेच टेस्टरने मारून खून केला होता.