जमिनीचा वाद विकोपाला, किराणा दुकानासमोर महिलेने घेतले विषारी औषध

Latur Crime News Chapoli
Latur Crime News Chapoli

चापोली (जि. लातूर) : जमिनीच्या वादावरून ब्रह्मवाडी येथील प्रेमलबाई व्यंकटराव कांबळे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी प्रेमलाबाई यांचा मुलगा केशव कांबळे यांनी दिलेल्या तक्रार दिली. त्यानुसार, केशव यांनी चापोली येथील तुकाराम किशन मद्रेवार आणि श्रीकांत तुकाराम मद्रेवार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले. बदल्यात जमिनीचा रहीन बैनामा करून दिला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण झाले.

त्याचे पैसे केशव यांना मिळू नये यासाठी तुकाराम आणि श्रीकांत यांनी भूसंपादन अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने पैसे केशव यांना मिळाले नाहीत. त्यामुळे प्रेमलाबाई यांनी मद्रेवार यांच्या किराणा दुकानासमोर शनिवारी (ता. २०) विष प्राशन केले. त्यांचा लातूर येथे सोमवारी (ता. २२) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com