Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Sudden Hailstorm Hits Latur and Dharashiv: लातूर व धाराशिव जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळबागांवर मोठा फटका बसून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
Dharashiv Hailstorm News

Dharashiv Hailstorm News

esakal

Updated on

लातूर: वादळी वाऱ्यासह मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सुमारे तासभर झालेल्या पावसाने लातूर शहराला झोडपून काढले. शहरात अनेक ठिकाणी गारांचा सडा पडला होता. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूरकरांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, देवणी, उदगीर तालुक्यात गारपीट, तर निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोदरदार पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह फळांना मोठा फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातही गारपीट, अवकाळी पाऊस झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com