

Sambhajirao Patil Nilangekar Questions Latur District Bank Management Ahead of Cooperative Bank Elections
esakal
निलंगा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रडीचा डाव खेळला जात असून सहकार मंत्र्यांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग करत विरोधकाचे उमेदवारी अर्ज अवैध करण्याचा घाट घातला जात आहे. बँकेची निवडणूक खुल्या वातावरणात होऊ द्या. बँकेचा कारभार चांगला की वाईट, हे जनतेला ठरवू द्या. जनतेच्या न्यायालयात येण्यास चेअरमन आणि काँग्रेस नेत्यांना भीती का वाटते, असा सवाल माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला. जिल्हा बँक सहकारी बँक न राहता देशमुख कुटुंबीयांची कॉर्पोरेट बँक झाली आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.