

Latur District Bank Election Nilanga Contest Heats Up as BJP Challenges Congress in Nilangekar Family Political Battle
esakal
निलंगा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक जाहीर झाली असून निलंगा तालुक्यातून सोसायटी मतदार संघातून संगीता अशोक पाटील निलंगेकर तर त्यांच्या विरोधात अरविंद पाटील निलंगेकर अशी पुतण्या विरुद्ध काकी अशी निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होत आहे. सतत बिनविरोध होणारी निवडणूक प्रक्रिया यंदा महायुती कडून पॅनल उभे करून अव्हाण देण्यात आल्याने ऐन दिवाळीत या निवडणूकीत रंगत भरणार आहे. काँग्रेसकडून एकहाती होणाऱ्या निवडणूकीत तगडे अव्हाण देण्यात आल्याने मतदाराचा 'भाव' आता वाढणार आहे.