
लातूर : जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ता.पाच ते २५ मार्च या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या नावाची पडताळणी करून त्यांचे नाव ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सोमवारी येथे दिल्या.